‘सोमेश्‍वर’ बोनसही उच्चांकी देणार

कामगार सभेत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची माहिती

वाघळवाडी – सोमेश्‍वर कारखाना ज्या प्रमाणे ऊस उत्पादक सभासदांना जास्तीत जास्त भाव देण्यामध्ये मागे राहिलेला नाही त्याच प्रमाणे कामगारांना बोनस रक्‍कम देण्यामध्ये देखील उच्चांक करणार आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमेश्‍वर कारखान्याकडे 2018-19 या गाळप हंगामामध्ये गाळपास असलेल्या उसास संचालक मंडळाने राज्यामध्ये विक्रमी प्रतिटन 3300/- भाव दिल्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळाचा जाहीर सत्कार कामगार सभेमध्ये करण्यात आला. यावेळी जगताप बोलत होत. ते म्हणाले की, सोमेश्‍वर उद्योग संघाच्या विविध प्रकल्पातून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊन 10 लाख 4 हजार मे.टनाचे उच्चांकी गाळप 2018-19 गाळप हंगामात केले. या हंगामामध्ये अल्कोहोल उत्पादन, वीज निर्मिती, साखर निर्मिती, बायोगॅस उत्पादन यामध्ये उच्चांकी उत्पादन घेतले. काटकसरीने व नियोजन पूर्ण ऊसतोडणी ऊस लागवड कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला व कामगारांनी त्यांच्या श्रमाचे योग्य नियोजन करून गाळपामध्ये मोलाचा सहभाग नोंदवला असून या उत्कृष्ट झालेल्या टीमवर्कमुळे व राज्याचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे सोमेश्‍वर कारखाना नेहमीच चढत्या क्रमाने उसास भाव देण्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे.

यावेळी उपाध्यक्ष शैलेश रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, लक्ष्मण गोफने, बाबुरावदादा भोसले, दौलतराव साळुंके, विशाल गायकवाड, महेश काकडे, हिराबाई वायाळ, ऋतुजा धुमाळ, बाळासाहेब काकडे, माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, दत्ता निंबाळकर, सोमेश्‍वर कामगार पतपेढीचे चेअरमन पंढरीनाथ राऊत संचालक मंडळ संघटनेचे संतोष भोसले, तानाजी सोरटे, विलास दानवले, राहुल सोरटे, धनंजय निकम, बाळासाहेब लकडे आदी उपस्थित होते.

एक दिवसाचा पगार पूरगस्तांना….
कामगार सभेत कार्यलक्ष्मी संचालक बाळासाहेब काकडे यांनी कामगारांच्या विविध मागण्यांचा उहापोह केला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी सर्व कर्मचारी, अधिकारी यांचा एक दिवसाचा पगार देण्यात यावा, असे अवाहन काकडे यांनी केले. याला सर्व कामगारांनी एकमुखी संमती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)