‘या’ फोटोंमुळे किवीच्या कर्णधारावर सोशल मीडिया फिदा 

नवी दिल्ली – विश्वचषकाचा मानकरी इंग्लंड ठरला असला तरीही सोशल माध्यमांवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याचीच जास्त चर्चा आहे.  सध्या विल्यम्सनचा एक फोटो चांगलाच व्हायरल  होत आहे.  यामध्ये विश्वचषक गमावूनही  विल्यम्सनच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य सर्वांचेच लक्ष्य वेधून घेत होते.

ख्रिस व्होक्‍स आणि लियाम प्लंकेट यांच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडची तगडी फलंदाजी ढेपाळल्याने न्यूझीलंडला निर्धारित 50 षटकांत 8 बाद 241 धावांचीच मजल मारता आली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 2019 विश्वचषक स्पर्धेत आपला फॉर्म कायम राखला.

दरम्यान, उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केल्याने लाखो क्रिकेटप्रेमींचे स्वप्न तुटले होते. यावेळी केन विल्यम्सनने भारतीय क्रिकेट चाहत्यांना विनंती केली होती कि, या सामन्यानंतर भारतीय चाहते आमच्यावर नाराज नसतील. अंतिम फेरीत आमच्यासोबत १३५ कोटी भारतीयांची प्रार्थना असेल, अशी मला आशा आहे. केन विल्यम्सन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाचे कर्णधार पद सांभाळतात. यामुळे भारतातही विल्यम्सनचे चाहते आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.