शाहरुख खानचा मुलगा असो किंवा अक्षय, अजय देवगणचे चिरंजीव असो, सोशल मीडियाच्या कृपेने या मंडळीच्या इंत्यभूत खबरा सामान्य नागरिकांपर्यंत पोचतात. म्हणायला हे स्टार किडस आहे, मात्र त्यांचेही वेगळे विश्व आहे. विश्वास बसत नसेल, तर सोशल मीडियावर या मुलांच्या ऍक्टिव्हिटी पाहा.
ही मुले देखील सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही आणि ते देखील आपली क्षमता वेळोवेळी आजमवतात. मात्र अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमचा पर्दाफाश केला झाला. या प्रकरणानंतर स्टार किडस्च्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सवर परिणाम झाला असला तरी सोशल मीडियावर छाप पाडणाऱ्या या सेलिब्रिटी मुलांची सोशल लाइफ आता ही चर्चेत असते.
अमिताभची नात नव्या नवेली
अमिताभ कन्या श्वेताची मुलगी नव्या नवेलीपासून आपण सुरवात करू. नव्याच्या खात्यावर आपल्याला परदेशातील पार्ट्यात ही कन्या कशी धमाल करते, हे आपल्याला पाहवयास मिळेल. तिचे परदेशात बिकीनी घालून नृत्य करतानाचे फोटो अगोदरच शेअर झाले आहेत. त्याचबरोबर पिंक रिलिज होण्यापूर्वी अमिताभने आपल्या नातीला पत्र लिहले होते आणि तेही खूप व्हायरल झाले होते. अमिताभला देखील नातीची लोकप्रियता चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच पिंकच्या प्रचारासाठी त्याने नातीची मदत घेतली होती. आता ती चित्रपटात कधी पाऊल ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खान पुत्र देखील मागे नाही
शाहरुख खानचा विषय असेल आणि आर्यनची चर्चा होणार नाही, असे शक्यच नाही. एकानंतर एक मुलींसमवेत दिसणाऱ्या आर्यनने आपणही ऍपल ऑफ दी इअर असल्याचे सिद्ध केले आहे. स्वत: शाहरुख खानही सक्रिय आहे. त्या ट्रेंडने आर्यन देखील प्रभावित झाला आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी त्याने एकदा ईदच्या वेळी वडिलांसमवेत चाहत्यांच्या गराड्यात जाण्यास नकार दिला होता. आर्यन स्वत:ची ओळख निर्माण करु इच्छित आहे. मात्र खान कुटुंबीय सोशल मीडियावर कमालीचे लोकप्रिय आहे. त्याचवेळी त्याचा दुसरा मुलगा अबराम हा आयपीएलच्या मैदानापासून शूटिंगपर्यंत वडिलासमवेत प्रत्येक वेळी असतो. ईदच्या दिवशी देखील तो वडिलांसमवेत राहतो. त्याचे फोटो शाहरुख आण आर्यनच्या वॉलवर झळकत राहतात.
सैफ कन्या सारा
सैफ अली आण अमृतासिंगची कन्या सारा अली खान ही नेहमीच सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. काही वर्षापूर्वी सारा कोलंबियाच्या विद्यापीठात शिक्षण घेत असताना सैफने साराशी निगडीत प्रश्न आणि चित्रपटात पदार्पण करण्याच्या प्रश्नावर फुलस्टॉप दिला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या गोष्टींवर लक्ष दिले जाईल, असे सांगण्यात आले. आता ती अभिनेत्री झाली असून वडील आणि भावाचे म्हणणे ऐकते. लाखो मंडळी तिला फॉलो करतात.
जान्हवीचे आस्ते कदम
सोशल मीडियाच्या धावपळीत सारा अली खाननंतर बोनी आणि श्रीदेवी कन्या जान्हवी कपूरचे नाव समोर येते. इन्स्टाग्रामवर तिला खूप फॉलोअर आहेत. सुंदरतेच्या बाबतीत मुलगी आईला टक्कर देते. तिचे बोल्ड ड्रेसेसमधील लूक, मित्रांबरोबर धिंगामस्ती करणारे फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होतात. मात्र आईच्या मृत्यूनंतर ती सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय राहिली आहे. धडक चित्रपटानंतर तिच्या करियरचा ग्राफ एकदम उतरला. या कारणामुळेच ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय राहत नाही. असे असले तरी तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही.
रायजिंग स्टार खुशी आणि आलिया
जान्हवीची लहान बहीण खूशी ही सोशल मीडियावरील एक रायजिंग स्टार आहे. ती एक ब्रॅंडचा चेहरा बनली आहे. या ब्रॅंडचा आणखी एक चेहरा अनुराग काश्यपची मुलगी आलिया कश्यप आहे. इंस्टाग्रामवर आलिया आपल्या टोंड फिगर आणि सुंदर चेहऱ्याचे अनेक फोटो शेअर करते. या फोटोला चाहत्यांची नेहमीच पसंती असते. चित्रपटात पाऊल टाकण्यापूर्वी आलियाला चांगल्या संख्येने फॅन फॉलोइंग आहेत. बिकीनीमधील तिचे फोटो खूपच लोकप्रिय ठरले आहेत.
आणखी एक आलिया
बॉलिवूडमध्ये आणखी एक आलिया आहे. आलिया फर्निचरवाला. ही अभिनेत्री पूजा बेदीची कन्या आहे. आर्ट-एडिटिंगवर आलिया सध्या काम करत आहे. मात्र सोशल मीडियावर तिची चर्चा हॉट बिकिनीवरूनच झाली होती. आलिया चित्रपट करियर कधी सुरू करते, याची चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत.
कलियुगातील कृष्णा
बिनधास्त वक्तव्य असो किंवा बोल्ड फोटो. या काळात सध्या टीकाकारांच्या रडारवर एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफची कन्या कृष्णा श्रॉफ. मात्र याची दुसरी बाजू देखील आहे. कृष्णा अतिशय चांगले फोटो शूट करते. ती सर्व फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. अशा स्थितीत ती दोन फोटोंमुळे गॉसीपच्या बाजारात चर्चेत आली. या कारणामुळे कृष्णा रातोरात स्टार बनली.
या स्टार किडसनी सोशल मीडियावर दबदबा निर्माण केला असला तरी बॉलिवूडमध्ये असे काही लोक आहेत की त्यांनी अजून डोळेही उघडले नाहीत की ते स्टार बनले आहेत. वयाच्या सातव्या वर्षी देखील सोशल मीडियावर त्यांनी आपल्या पालकांना मागे सोडले आहे. आताच जन्मलेले काही जण तर सोशल मीडियावर राज्य करत आहेत.
यात सर्वात आघाडीवर करिना कपूर आणि सैफचा मुलगा तैमूरचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. त्याने आपल्या क्यूट लूकने सोशल मीडियावर छाप पाडली आहे. करिना आणि सैफपेक्षा तैमूरचे फोटो अधिक व्हायरल होताना दिसतात.याशिवाय शाहिद कपूरची कन्या मिशा कपूर, अभिषेक आणि ऐश्वर्या कन्या आराध्या, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची कन्या नितारा भाटिया, आमीर खानचा मुलगा आझाद हा देखील सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.