शाओमीच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये असणार ‘अर्थक्वेर’ फीचर्स

नवी दिल्ली – चीनची स्मार्टफोन कंपनी ‘शाओमी’ आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर्स घेऊन आली आहे. बीजिंग येथे झालेल्या कॉन्फ्रेंसमध्ये शाओमीच्या सर्व स्मार्टफोनमध्ये हे नवीन फीचर्स येणार असल्याची अधिकृत घोषणा कंपनीने केली.

कंपनीचे युजर्स आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा लक्षात घेऊन “अर्थक्वेर”(भूकंप) हे नवीन फीचर्स आणले आहे. हे फीचर भूकंपाच्या आधी 10 सेंकद युजर्सला अलर्ट करेल. त्यामुळे युजर्स भूकंपाच्या आधी सुरक्षित ठिकाणी पोहचू शकेल.

दरम्यान, हे नवीन फीचर चीनमधील युजर्सला लेटेस्ट ‘एमआययूआय 11’ ऑपरेटिंग सिस्टममध्ये मिळेल. तसेच हे भूकंपाची माहिती देणारे फीचर्स शाओमी स्मार्ट टीव्हीमध्ये देखील सपोर्ट करेल. सध्या हे फीचर शाओमीने केवळ चीनमध्ये लाँच केले आहे. मात्र कंपनी लवकरच काही ठराविक संस्थेबरोबर मिळून इतर देशात देखील हे फीचर लाँच करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.