मुंबई – द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपला आगामी चित्रपट द वॅक्सिन वॉर’ची घोषणा केल्यानंतर या चित्रपटात कोण कोण कलाकार असणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काश्मीर फाईल्सच अनेकांनी कौतुक केलं तर अनेकांनी टीकाही केली त्यामुळे विवेक अग्निहोत्री चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर आता वॅक्सिन वॉर या चित्रपटाच्या सेटवर जय श्रीराम आणि भारत माता कि जयच्या घोषणा दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
विवेक अग्निहोत्रीने वॅक्सिन वॉरची घोषणा केली, तेव्हापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती.आता या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये चित्रपटातील कलाकारांसह चित्रपट निर्माते दिसत आहेत. हे सर्वजण जय श्री राम आणि भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत असल्याचे पाहायला मिळते. चित्रपटामध्ये देशातील वैज्ञानिकांचा एक प्रेरक प्रवास दाखवला जाणार आहे.
From the sets of #TheVaccineWar.
Independence Day. 2023. pic.twitter.com/8rySVpKfz9— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 4, 2023
ही घोषणाबाजी नेमकी का झाली त्यावेळी काय शूटिंग झाले याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा व्हिडीओ शार केला आहे. या चित्रपटात अनुपम खैर यांच्यासह अभिनेता नाना पाटेकर देखील दिसणार असल्याचे समोर आल्यानंतर चित्रपटाची उत्कंठा आणखी वाढली आहे. हिंदी,इंग्रजी,तमिळ,तेलगू अशा तब्बल १० भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. स्वात्रंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.