द स्काय इज पिंकचा चा ट्रेलर रिलिज

बॉलिवूड एक्‍ट्रेस प्रियंका चोपडा द स्काय इज पिंक सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर मंगलवारी रिलीज करण्यात आला आहे. तीन मिनिटांचा असलेला ट्रेलर बराच दमदार आहे. या ट्रेलरमध्ये प्रियंकाचा एक वेगळाच अंदाज येथे बघायला मिळतोय. हा सिनेमा अनेक प्रकारे खास आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडला राम राम करणारी जायरा वसीम सुद्धा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हा सिनेमा गुरूग्राममध्ये राहणारी 13 वर्षांची मोटिवेशनल स्पीकर आयशा चौधरीवर आधारित आहे. आयशाला इम्यून डिफिशिएंसी डिसऑर्डरची समस्या होती. ज्यामुळे तिचे 2015 साली निधन झाले. आयशाने टॉक शोजमध्ये दिलेल्या व्याख्यानामुळे प्रसिद्ध झाली होती. फरहान आणि प्रियंका या सिनेमात आयशाच्या पालकांची भूमिका साकारताना दिसतील.

द स्काय इज पिंक हा सिनेमा येत्या 11 ऑक्‍टोबरला रिलीज होणार आहे. एसके ग्लोबल आणि पर्पल पेबल पिक्‍चर्स यांनी एकत्र मिळून हा सिनेमा आरएसव्हीपी आणि रॉय कपूर फिल्म्सनं प्रोड्यूस केला आहे. या सिनेमाची निर्मिती शोनाली बोस करत आहे. या सिनेमाची बॉक्‍स ऑफिसवर टक्कर सैफ अली खानचा लाल कप्तानशी होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×