नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता तणावाचे वातावरण कमी होताना दिसत आहे.कारण याविषयी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी माहिती दिली आहे. भारत चीन सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे नरवणे यांनी म्हटले आहे. देहरादून येथील सैन्य अकादमीमध्ये शनिवारी पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
#WATCH: Army chief General MM Naravane reviews the Passing Out Parade of 423 officers at Indian Military Academy (IMA) in Dehradun, Uttarakhand. pic.twitter.com/H7b4Vjmud4
— ANI (@ANI) June 13, 2020
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावावरून केंद्र सरकारवरही टीका करण्यात येत होती. तसेच अनेकांनी याबाबत चिंताही व्यक्त केली होती. अशा परिस्थितीतच लष्कर प्रमुख नरवणे यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी बोलताना त्यांनी, चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमा पूर्णपणे नियंत्रणात आहेत, याचे मी आश्वासन देतो. तसेच चीनसोबत आमची कमांडर स्तरावरील बैठकीचं सत्र सुरू आहे,” असे नरवणे म्हणाले.या बरोबरच स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चां सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चां सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नेपाळसोबत सुरू असलेल्या वादावरही त्यांनी यावेळी सकारात्मकरित्या भाष्य केले. आमचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध आहेत. दोन्ही देशांच्या लोकांना एकत्र जोडण्यासाठी आमच्याकडे चांगल्या व्यक्ती आहे. आमचे संबंध कायम उत्तम होते आणि भविष्यातही राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. करोना संकटादरम्या पार पडलेल्या परेडमध्ये प्रोटोकॉल पूर्णपणे पाळले हेले. तसंच कॅटेड्सनं मास्क परिधान करून परेड केली. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. दरम्यान, या परेडचं युट्यूबर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी नरवणे यांनी कॅडेट्सच्या कुटुंबीयांना संबोधितही केले. आजवर ही तुमची मुलं होती आता ती आमची झाली आहे, असे ते यावेळी म्हणाले. तसेच अकादमीच्या इतिहासात प्रथमच कॅडेट्सच्या कुटुंबीयांच्या त्यांच्या गणवेशावर स्टार लावता आले नसल्याचेही दिसले.