उत्तर प्रदेश – विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही अयोध्येतून प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे.
The condition of Muslims has become like a ‘band baja party’ in a marriage procession where they (Muslims) are first asked to play music, but are made to stand outside on reaching the wedding venue: AIMIM president Asaduddin Owaisi in Kanpur (26.09) pic.twitter.com/nY61BBX7gH
— ANI UP (@ANINewsUP) September 27, 2021
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता पर्यंत अनेक सभा घेतल्या आहेत. यातच एका दौऱ्यादरम्यान त्यांनी विरोधकांवर टीका केली असून मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी म्हणाले, ‘मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे मुस्लिमांना आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं
मात्र मुस्लीम वाद्य वाजवणार नाहीत. प्रत्येक जातीकडेही त्यांचा नेता आहे, मात्र मुस्लिमांकडे त्यांचा नेता नाही. उत्तर प्रदेशात १९ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, मात्र एकही नेता नाही. मात्र येत्या निवडणुकीत निवडणुकीत ४०३ जागांपैकी १०० ठिकाणी आपले उमेदवार असतील अशी घोषणा ओवेसी यांनी केली आहे.