“लालसिंग चढ्ढा’चे शुटिंग संपले

आमिर खान आणि करीना कपूरने आज “लालसिंग चढ्ढा’चे शुटिंग संपवले. करिनाने इन्स्टाग्रामवर तिचा आणि आमिर खानचा सेटवरचा फोटो पोस्ट करून या सिनेमाचे शुटिंग संपल्याची घोषणा केली आहे. या फोटोमध्ये आमिर आणि करिना एका शेताजवळ मस्त उन्हामध्ये खुर्च्या टाकून गप्पा मारत बसलेले दिसत आहेत.

करोनाची जगभर पसरलेली साथ आणि प्रेग्नन्सी यामुळेही हे शुटिंग थांबू शकले नव्हते, असे करिनाने अभिमानाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. या शुटिंगसाठी “लालसिंग चढ्ढा’च्या युनिटने विशेष खबरदारीचे उपाय योजले होते, हेदेखील सांगायला करिना विसरली नाही. या सिनेमासाठी ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्या सर्वांचे करिनाने आभार मानले आहे.

“लालसिंग चढ्ढा’ हा 1994 सालच्या “फॉरेस्ट गंप’ या हॉलीवूडच्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. करिना आणि आमिरने यापूर्वी “तलाश’ आणि “3 इडिएट’मध्ये एकत्र काम केले होते. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हीच केमिस्ट्री आता “लालसिंग चढ्ढा’मध्ये अनुभवली जाणार आहे. या सिनेमामध्ये मोना सिंगदेखील मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.