सलमानच्या “राधे’चे शुटिंग अचानक थांबवावे लागले आहे. आता केवळ 10 दिवसांचे शुटिंग शिल्लक राहिले आहे. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे आता काही दिवस तरी हे शुटिंग सुरू होऊ शकणार नाही. “लॉकडाऊन’ थांबल्यानंतर लगेचच हे शुटिंग पुन्हा सुरू होऊ शकेल. दरम्यान, आता सलमानचा आगामी सिनेमा “कभी ईद कभी दिवाली’चे शुटिंग वेळापत्रकाच्या पूर्वीच सुरू होण्याची शक्यता आहे.
सलमानचे बहुतेक सिनेमे ईदच्या सुमारास रिलीज होतात. त्यानुसार “कभी ईद…’ पुढच्या वर्षी ईदच्या सुमारास रिलीज होणार आहे. या सिनेमाचे शुटिंग या वर्षाच्या अखेरीला सुरू होणार होते. आता हे शुटिंग ऑगस्ट महिन्यातच सुरू होणार आहे. हा एक फॅमिली ड्रामा असणार आहे. त्यामध्ये सलमानच्या बरोबर त्याचा मेव्हणा आयुष शर्मा आणि पूजा हेगडे असणार आहेत. “राधे’ची रिलीज डेट आता कोणती ठरणार आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.
महेश मांजरेकरची कन्या सई मांजरेकरपाठोपाठ आता तिची बहीण अश्विनी हिला देखील तो लॉंच करणार आहे. तिने एक फूड ट्रक खरेदी केला आहे. हा फूड ट्रक आता सलमान खानच्या शुटिंगच्यावेळी सेटवर दिसणार आहे.