आता पवारांना पक्षात घेऊ नका, कुणी तरी समोर ठेवा !- उद्धव ठाकरे

अमरावती: सगळेच आपल्या पक्षात मग बोलायचं कोणावर? आता पवारांना पक्षात घेऊ नका, कुणी तरी समोर ठेवा टीका करण्यासाठी, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा काढला. शिवसेना–भाजप अमरावतीत  युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी शिवसेना भाजप ओळखत नाही, मी फक्त भगवा ओळखतो. हिंदुत्वाचा पाईक असलेला पंतप्रधान तिथे बसवणं हे आमचं काम आहे. गारूडी येऊ द्या किंवा कोणी येऊ द्या सापाची अवलाद आपल्याकडे नाही.
आता जे करायचे ते मनापासून करायचे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

युतीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, देशाचं भलं होण्यासाठी आपण एकत्र आलो, नाही तर आपल्या डोक्यावर कोण बसलं असतं. जर युती झाली नसती तर कुणाचं फावलं असतं, म्हणून युतीच आशा आहे.दहशतवाद्यांसमोर झुकणारे ते पूर्वीचे सरकार आपल्याला नको. आज आम्ही मजबूत आहोत, पुलवामा हल्ल्यानंतर प्रतिहल्ला करून ताकद दाखवली
पण शिवसेनाप्रमुख-अटलजी यांच्या पिढीने रक्त आटवल्याने हिंदुत्व टिकले. आधी हिंदू म्हणजे शिवी झाली होती
शिवसेना-भाजप ही सामान्य माणसाची शेवटची आशा आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here