एअर स्ट्राईकमध्ये भारताने वापरली ही ‘सात’ शस्त्रास्त्रे

भारताने या एअर स्ट्राईकच्या वेळी सात घातक शस्त्रास्त्रे वापरली त्याची माहिती पुढील प्रमाणे –

1) हवाई हल्ल्‌यासाठी मिराज 2000 विमानांचा वापर करण्यात आला. ग्वालियर येथील तळावरुन या फायटर जेटसनी उड्डाण केले. राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या दास्सूू कंपनीनेच या विमानांची निर्मिती केली आहे. 1980 च्या दशकात मिराज 2000 विमाने इंडियन एअर फोर्समध्ये दाखल झाली. त्याच बरोबर या एअर स्ट्राईकचा कोणाला संशय येऊ नये म्हणुन देश भरातील 20 वेगळ्या एअर बेसवरुन ही विमाने एका ठिकाणी जमा झाली.

2) जीबीयू-12 हा अमेरिकन बनावटीचा लेझर गाईडेड बॉम्ब आहे. अचूक आणि नेमका हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. हे बॉम्ब भारताने दहशतवाद्यांच्या अड्‌डयांवर फेकले ज्याद्वारे दहशतवाद्यांचे अड्डे अचुकपणे उध्वस्त केले गेले.

3) मॅट्रा मॅजिक क्‍लोज कॉम्बॅट मिसाइल: भारतीय विमाने बॉम्बफेक करताना पाकिस्तानी हवाई दलाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा सामना करण्यासाठी मॅट्रा मॅजिक क्‍लोज कॉम्बॅट मिसाइलही मिराजमध्ये बसवण्यात आले होते. मॅट्रा ही फ्रान्सची कंपनी आहे. एअर टू एअर लढाईसाठी हे मिसाइल वापरण्यात येते. याद्वारे शत्रुचे विमान हवेत उडवता येते.

4) लाइटनिंग पॉड: लक्ष्याचा माग काढून टार्गेटवर अचूक बॉम्ब फेक करण्यासाठी या लेझर पॉडचा वापर करण्यात आला. जगातील अत्याधुनिक हवाई दले या पॉडचा वापर करतात. ज्याद्वारे धावते लक्ष्य जसे गाड्या, हेलिकॉप्टर अथवा लढाऊ विमाने यांना अचुकपणे भेदण्याचे काम या द्वारे करता येते.

5) नेत्र अर्ली वॉर्निंग एअरबॉर्न: ज्यावेळी भारताची 12 मिराज विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली त्यावेळी स्वदेशी बनावटीच्या “नेत्र’ या एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग विमानाद्वारे बारा विमानांमध्ये समन्वय ठेवण्यात आला. नेत्र हे अत्याधुनिक रडारने सुसज्ज असलेले विमान आहे. हवाई हल्ल्‌याच्यावेळी योग्य समन्वय आणि टार्गेट हेरण्यासाठी मदत या विमानाने केली.

6) हेरॉन ड्रोन मिराज विमानांमधिल वैमानिकांच्या मदतीसाठी नियंत्रण रेषेवर लक्ष्य ठेवण्यासाठी तसेच तेथील हालचाली हेरण्यासाठी या ड्रोनचा वापर केला गेला.

7) एल्युशिन 78 एम – याचा वापर लढाऊ विमानांना हवेतल्या हवेत इंधन भरण्यासाठी होतो. जर पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेल्या कोणत्याही विमानाला इंधनाची गरज भासली असती तर याचा वापर करण्यात आला असता.

Leave A Reply

Your email address will not be published.