पुणे – ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर भाष्य करणाऱ्या बार्शीच्या अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय कामगगिरी व उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक देवकर यांचा ‘म्होरक्या’ हा पहिलाच चित्रपट आहे.
अमर देवकर यांनी ६ वर्षात ८२ लघुपट पूर्ण केले आहेत. चित्रपटाशी संबंधित सर्व विभागातील कामाचा अनुभव घेतल्यानंतर ‘म्होरक्या’ हा चित्रपट करण्याचे त्यांन ठरविले. त्यासाठी दोन एकर जमीनही विकली. कल्पनाच्या जगात जगण्यापेक्षा आपल्या सभोवताली जे घडते ते पाहणे प्रेक्षकांना आवडते याचा विचार करुन ग्रामीण वास्तव व प्रामाणिकपणावर आधारित व ग्रामीण भागाच्या समस्या मंडण्याण्यासाठी देवकर यांनी ‘म्होरक्या’ची निर्माती केल्याचे दै. प्रभातला सांगितले…
चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे आणि यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत. येत्या २४ जानेवारीला ‘म्होरक्या’ रुपेरी पडद्यावर येणार आहे.