पिंपरी-चिंचवड- शहरातील २२ मार्चपासून थांबलेली पीएमपीची सार्वजनिक वाहतूक सेवाही खुली करण्यास आयुक्तांनी परवागी दिली आहे. मंगळवार दि. २६ मे पासून आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रवाशांची वाहतूक पीएमपीमधून करता येणार आहे. प्रवाशांनी सामाजिक अंतर राखून प्रवास करावी, अशी अट ठेवण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने बंद असलेली क्रीडा संकुले, सार्वजनिक वाचनालये, स्टेडियम सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्या (दि. २२) पासून खुली होणार आहेत. या ठिकाणी वैयक्तीकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळण्याचे खेळ, योगासने या बाबींना परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाचनालयांमध्येही आता नागरिकांना जाता येणार आहे. स्टेडियममध्ये एकत्र येऊन खेळण्यासाठीच्या क्रिकेट, खो-खो, कबड्डी, हॉकी, फुटबॉलसारख्या खेळांना मात्र यापुढेही बंदी कायम असणार आहे.