सीरम इन्स्टिट्युट करणार अतिरिक्‍त 100 दशलक्ष डोसचे उत्पादन

Madhuvan

नवी दिल्ली – गावी आणि बिल ऍन्ड मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशनच्या बरोबर मिळून भारतासाठी कोविड-19 च्या लसीच्या अतिरिक्‍त 100 दशलक्ष डोसचे उत्पादन करणार असल्याचे सीरम इन्स्टिट्युटने म्हटले आहे.

आणखी दोन भागीदार मिळाल्याने देशात सरासरी 200 दशलक्ष डोस उपलब्ध करून दिले जातील, असे सीरम इन्स्टिट्युटने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ऑगस्ट महिन्यात सीरम इन्स्टिट्युटने करोनाविरोधी लसीचे उत्पादन वेगात करण्यासाठी आणि 100 दशलक्ष डोस करण्यासाठी गावी या आंतरराष्ट्रीय भागीदाराबरोबर बिल ऍन्ड मेलिंडा गेट्‌स फौंडेशनबरोबरही भागीदारी केली. या वाढीव भागीदरीमुळे सीरम इन्स्टिट्युटची उत्पादक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

करोना विरोधी लसीला नियमित मंजूरी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या पूर्वअटींची पूर्तता केल्याची मंजूरी मिळल्यनंतर ही लस वितरीत करायला सुरुवात होईल. गावी कोवॅक्‍स एएमसी यंत्रणेतून 2021 च्या पूर्वार्धापर्यंत वितरण केली जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.