आमिर खानच्या बहुचर्चित “पीके’चा येणार सीक्‍वल; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि अनुष्का शर्मा स्टार “पीके’ चित्रपटाने 2014मध्ये बॉक्‍स ऑफिसवर चांगली धमाल केली होती. या चित्रपटाच्या लास्ट सीनमध्ये रणबीर कपूरलाही दाखविण्यात आले होते. आता अशी चर्चा आहे की, या चित्रपटाचा सीक्‍वल येत असून यात आमिरनंतर आता रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे.

प्रोड्यूसर विधु विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाची तयारी पूर्ण केली असून “पीके’चा सीक्‍वल येणार असल्याची पुष्टीही त्यांनी दिली आहे. ते म्हणाले, “पीके’ चित्रपटाचा सीक्‍वल योग्यवेळी बनविण्यात येणार आहे. मागील भागात रणबीर कपूरला चित्रपटाच्या अखेरीस ग्रहावरून उतरताना दाखविण्यात आले होते. यामुळे आता रणबीरच ही कहानी पुढे सुरू करणार आहे.

विधु चोप्रा म्हणाले की, लेखक अभिजात जोशी यांनी अद्याप चित्रपटाची कथा लिहिलेली नाही. परंतु ती पूर्ण होताच या चित्रपटाच्या सिक्‍वलचे काम सुरू करण्यात येईल.

दरम्यान, “पीके’मध्ये परग्रहावरून आलेल्या एका व्यक्‍तीच्या आसपास दाखविण्यात आली होती. यात तो सर्वसामान्य माणसासारखा दिसत असला तरी त्याची बौद्धिक क्षमता ही मुनष्यापेक्षा खूप अधिक आहे. तो सरळ आणि सभ्य स्वभावाचा होता. या चित्रपटात आमिरने साकारलेला अभिनय चाहत्यांना खूपच आवडला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.