सहा महिन्यांत सेन्सेक्‍स 1000 अंकांनी वाढला

सेन्सेक्स @ 37337
 
पाच दिवसांत 7.67 लाख कोटींचा फायदा

नवी दिल्ली: अमेरीका आणि युरोपीय समुदायादरम्यानचा व्यापारातील तणाव कमी होत आहे त्याचबरोबर ब्ल्यू चीप कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी चालू ठेवली आहे. त्यामुळे आज सलग पाचव्या दिवशी शेअरबाजार निर्देशांकांत वाढ झाली. जीएसटीत करकपात झाल्यामुळे कंपन्याची विक्री वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून निर्देशांक ऐतिहासिक उच्च पातळीवर आहेत. मात्र, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे काही सावध गुंतवणूकदार नफाही काढून घेत आहेत.

गेल्या पाच दिवसात सेन्सेक्‍स 2.30 टक्‍क्‍यानी म्हणजे 840 अंकानी वाढल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात 4.67 लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी मुंबई शेअरबाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य 14677027 कोटी रुपये होते. ते आता 15144543 कोटी रुपयांवर गेले आहे.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 352 अंकानी म्हणजे 0.95 टक्‍क्‍यांनी वाढून 37337 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. सकाळी सेन्सेक्‍स 37368 अंकापर्यंत वाढला होता. मात्र नंतर नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांकांना ती पातळी राखता आली नाही. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 111अंकानी वाढून 11278 अंकावर बंद झाला.
काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2453 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 2716 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रुपया गेल्या दोन दिवसात काही प्रमाणात मजबूत झाल्यामुळेही निर्देशांकांना आधार मिळत आहे. एकूणच आज खरेदीसाठी पूरक वातावरण असल्यामुळे मिडकॅप 0.95 टक्‍क्‍यांनी वाढला तर स्मॉल कॅप 0.88 टक्‍क्‍यानी वाढला.
सेन्सेक्‍ससंबंधातील 30 पैकी 20 कंपन्याच्या शेअरच्या भावात आज वाढ झाली.गेल्या काही दिवसापासून केवळ काही कंपन्यांच्या शेअरे भाव वाढत होते.
कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत आहेत. त्याचबरोबर भांडवल सुलभता आहे, त्यामुळे खरेदीसाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यातच रुपयाचे मुल्य आता आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही विक्रीपेक्षा खरेदीचे प्रमाण जास्त आहे.
जीएसटी परिषदेने परवा बऱ्याच वस्तूवरील कर 28 टक्‍क्‍यावरून 16 टक्‍के केले आहेत. पावसाळा चांगला असल्यामुळे ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढणार आहे. त्यामुळे बाजारातील मूड सकारात्मक आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)