कोरोनाची दुसरी लाट…भारतीयांसाठी अमेरिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे देशाची संपूर्ण आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांना दरवाजे बंद केले आहेत. इतर देशांपाठोपाठ अमेरिकेनेही भारतासोबतचा प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात करोनाची दुसरी लाट आली आहे. भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून, बेड, ऑक्सिजन, औषधींसाठी रुग्ण आणि नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत. स्मशानभूमींमध्येही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या असून, देशातील या भयावह परिस्थितीनंतर अनेक देशांनी भारतातून येणाऱ्यांना प्रवेश बंदी वा निर्बंध लादले आहेत. इतर देशांपाठोपाठ अमेरिकेनेही भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मे पासून या निर्णय लागू होणार आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव जेन साकी यांनी या निर्णयाची माहिती दिली. भारतातून येणाऱ्यांवर निर्बंध लागण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ४ मेपासून हा निर्णय लागू होईल. अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राने दिलेल्या सल्ल्यानंतर प्रशासनाने तातडीने भारतातून येणाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रचंड रुग्णवाढ झाली आहे आणि त्याचबरोबर विविध स्ट्रेन देशभरात पसरले असून, त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे जेन साकी यांनी सांगितले.

अमेरिकेने यापूर्वीच आपल्या नागरिकांना भारत दौरा टाळण्याचे आवाहन केले होते. लस घेतलेली असली, तरी अमेरिकने नागरिकांनी भारतात जाणं टाळावं. फारच गरजेचं असेल तर लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच जावं, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता भारतातून येणाऱ्यांवर आता निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रान्स, यूएई, पाकिस्तान आणि सिंगापूर या देशांनी भारतातून येणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.