नवी दिल्ली – “डीआरडीओ’ ने आज स्वदेशी बनावटीच्या पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या घेतली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली.
प्रथमच, सलग दोन दिवस बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या सलग दोन उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. हे प्रक्षेपण क्षेपणास्त्राच्या दोन्ही प्रकारातील उपयोगिता सिद्ध करणारे होते.
आज”प्रलय’क्षेपणास्त्राची अधिक वजनासह वेगळ्या श्रेणीसाठी चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणाचे, पूर्व किनारपट्टीवर तैनात इम्पॅक्ट पॉईंटजवळील डाउन रेंज जहाजे, टेलीमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक ट्रॅकिंग सिस्टीमसह सर्व रेंज सेन्सर्स उपकरणांद्वारे निरीक्षण केले गेले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या सलग यशस्वी उड्डाण चाचणीसाठी डीआरडीओ आणि संबंधित पथकांचे अभिनंदन केले आहे.