सुपरमून 2019 : आज रात्री दिसणार वर्षातील सर्वात मोठा ‘चंद्र’

नवी दिल्ली – आज रात्री भारतात सुपरमून पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. त्यामुळे आजच्या रात्री चंद्र हा नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के अधिक चमकदार दिसेल.

नासा ने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. चंद्र-पृथ्वीची ही स्थिती पुन्हा 2026 मध्ये पाहायला मिळेल. आज रात्री 9 वाजून 23 मिनिटांनी जगभरातून या सूपरमूनचे दर्शन घडेल.

आज चंद्राचं सौंदर्य पाहण्याची संधी दवडली तर पुन्हा सुपरमून बघण्यासाठी आणखी 7 वर्ष वाट पाहावी लागेल. 21 जानेवारीला देखील सुपरमून दिसला होता. मात्र तो भारतात दिसला नसल्याने आज भारतीयांना सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.