Covishield । …तर पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले नसले तरी मिळणार दुसरा डोस

नवी दिल्ली ( Covishield vaccine second dose ) – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यातच कोव्हिन पोर्टलवर कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या लसीसाठी आता १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. कोव्हिन डिजिटल पोर्टलवर दोन डोसच्या दरम्यानचा कालावधीमध्ये पुन्हा बदल केला आहे.

आता कोव्हिडशील्डची दुसरी लस ही १२ ते १६ आठवड्यानंतर मिळणार आहे. पहिल्या डोससाठी करण्यात आलेली नोंदणी ही दुसऱ्या डोससाठी सुद्धा लागू राहणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिन डिजिटल पोर्टलवर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा ८४ दिवसांनी मिळणार आहे. दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांआधीच ज्यांना नोंदणी केली होती त्यांना लसीकरण केंद्रावरून परत पाठवण्यात येत आहे.

कोव्हिन पोर्टलवर ज्यांनी लसीचा पहिला डोस घेण्यासाठी नोंदणी केली आहे. ती नोदंणी दुसऱ्या डोससाठी सुद्धा ग्राह्य ठरणार आहे. डॉ. एनके अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड वर्किंग ग्रुपने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसची मुदत १२ ​​ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यामुळे १३ मे पासून हा बदल करण्यात आला आहे.

“केंद्र शासनाने राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांना या संदर्भात माहिती दिली आहे. हा बदल होण्याआधीच ज्यांनी दुसऱ्या डोससाठी नोंदणी केली आहे त्यांना लस देण्यास सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी आलेल्या लोकांनी आधीच नोंदणी केली असेल तर त्यांना लस न देता पाठवू नये अशी सूचना दिली आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दुसऱ्या डोससाठी वाढवण्यात आलेल्या कालावधीची माहिती लसीकरणासाठी आलेल्या लोकांना देण्यास सांगितले आहे”.

दरम्यान, कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या कालावधीमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस हा पहिल्या डोसच्या चार ते सहा आठवड्यांपर्यंत घेता येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.