वायुदलाच्या विमानाचा शोध तिसऱ्या दिवशीही सुरुच

इटानगर/ नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील पश्‍चिम सियांग जिल्ह्यातल्या मेंचुका डोंगराळ भागातून बेपत्ता झालेल्या हवाईदलाच्या मालवाहू विमानाचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरुच राहिला. आतापर्यंत 2 “सुखोई-30′ आणि 2 “”सी-130जे’ यांच्यासह “एएन-32′ विमाने, 2 “एमआय-17′ हेलिकॉप्टर आणि 2 “एएलएच’ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या विमानाचा शोध घेतला जात आहे. लष्कर, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि राज्य पोलिस दलांकडून जमिनीवरही या विमानाचा शोध घेतला जात आहे.

या विमानाबाबत कोणताही “सिग्नल’ किंवा इमर्जन्सी लोकेशन” मिळू शकलेले नाही, असे बचाव पथकातील लष्करी सूत्रांनी सांगितले. मात्र सिग्नल पाठवणारी विमानातील यंत्रणा अद्यापही कार्यरत असावी अशी शक्‍यताही या लष्करी सूत्रांनी व्यक्‍त केली आहे.

बेपत्ता झालेल्या विमानामधील रडारची यंत्रणा अद्ययावत करणे बाकी होते. काही “एएन-32′ विमानांमधील रडार यंत्रणा पुरेशी सक्षम आहे. या विमानाच्या शोधासाठी नौदलानेही हेलिकॉप्टर आणि टेहळणी विमानांद्वारे शोध घ्यायला सुरुवात केली आहे. “इस्रो’च्या कार्टोसॅट आणि रिसॅट या उपग्रहांद्वारे या भागाची छायाचित्रे काढून त्याद्वारेही विमानाचा शोध घेतला जात आहे.

रशियन बनावटीचे “एएन-32′ हे विमान 13 प्रवाशांना घेऊन आसाममधील जोरहाट येथून मेंचुका येथे जाण्यासाठी सोमवारी दुपारी निघाल्यानंतर बेपत्ता झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.