“डॉन 3′ साठी चांगल्या कथानकाचा शोध सुरू

बॉलीवूडमध्ये एखाद्या फ्रॅंचाईजीचा फॉर्म्युला हिट झाला की लागोपाठ त्याचे सिक्वल काढायला सुरुवात होते. जुन्या गाजलेल्या सिनेमांचे रिमेक काढून त्यांचेही सिक्‍वल काढण्याची परंपरा सुरू झाली आहे. 2006 मध्ये फरहान अख्तरच्या डायरेक्‍शनमध्ये “डॉन’ चा रिमेक केला गेला तर त्याच्या दुसऱ्या भागात कथेला एक वेगळाच ट्‌विस्ट दिला गेला होता.

2011 मध्ये “डॉन 2′ आला, पण त्याला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. मुळात अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या “डॉन’च्या रिमेकमध्ये अमिताभ यांच्या जागेवर शाहरुख खानला बघणे प्रेक्षकांच्या पचनी पडलेले नव्हते “डॉन 3’ची ही चर्चा गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. पण अद्याप त्याची अधिकृत घोषणा केली गेलेली नाही.

“डॉन 3’साठी चांगली कथा सध्या शोधली जात आहे. योग्य कथा मिळाल्यावर “डॉन 3’ची घोषणा केली जाईल असे सहनिर्माता रितेश सिधवानी यांनी सांगितले. सध्या शाहरुख खान “पठाण’च्या गडबडीत आहे. “पठाण’ संपल्यानंतर “डॉन 3′ ची तयारी सुरू केली जाऊ शकेल. तोपर्यंत निर्मात्यांना योग्य कथा मिळेल अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.