बहुचर्चित ‘हेराफेरी 3’ची स्क्रिप्ट झाली तयार

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या “हेराफेरी’ने किती धमाल उडवून दिली होती, याची प्रेक्षकांना आठवण असेल. या सिनेमाला 21 वर्ष होऊन गेली आहेत. त्याच्यानंतर “फिर हेराफेरी’देखील येऊन गेला. त्यानेही अशीच धमाल उडवून दिलेली होती. या तिकडीची धम्माल कॉमेडी असलेल्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत.

या तिसऱ्या भागाची म्हणजे “हेराफेरी 3′ ची स्क्रिप्ट फायनल झाली आहे, असे समजले आहे. “हेराफेरी’चे डायरेक्‍शन प्रियदर्शनने तर “फिर हेराफेरी’चे डायरेक्‍शन नीरज व्होराने केले होते. तिसऱ्या भागाची जबाबदारी कोणावर सोपवायची हे अद्याप निश्‍चित नाही. अजून इतर कलाकारांची नावेही निश्‍चित झालेली नाहीत.

पण यथावकाश हे सर्वकाही होईल आणि लवकरच “हेराफेरी 3’ची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. “हेराफेरी’चा दुसरा भाग म्हणजेच “फिर हेराफेरी’ जिथे समाप्त झाला होता, तेथूनच तिसऱ्या भागाची सुरुवात होणार आहे. अजून काही अपडेट मिळाले तर ते नक्कीच दिले जातील, असे निर्माता फिरोज नाडियादवालाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.