सोनू सूद यांच्यावरील कारवाईची व्याप्ती वाढली

मुंबई – आम आदमी पक्षाच्या सरकारचा ब्रॅंड ऍम्बॅसिडर बनलेले अभिनेते सोनू सूद यांच्या विरोधातील आयकर विभागाच्या कारवाईची व्याप्ती आता वाढली आहे. सूद यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर आयकर खात्याने शुक्रवारी छापेमारी केली.

बुधवारी त्यांच्या ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला होता व त्यांच्याशी संबंधित लोकांची चौकशी करण्यात आली होती. सूद यांच्याशी संबंधित मुंबई, दिल्ली आणि लखनौ या ठिकाणांवर जाऊन

आयकर अधिकाऱ्यांनी तेथील कागदपत्रांची तपासणीही केली होती. सोनू सूद यांनी अलिकडच्या काळात केलेले काही खरेदी व्यवहार तसेच जमिनींचे व्यवहारही तपासले जात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.