सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेचा कायापालट

सुपा: पारनेर तालुक्‍यातील रुईछत्रपती येथील एका तरूणाने गावातील तरूणांना एकत्र करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाटस्‌ ऍपवर ग्रुप तयार करून, गावातील ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या ‘श्री ज्ञानेश्वर विद्यालय रूई छत्रपती’ विद्यालयाच्या कंपाऊंडसाठी ग्रुपच्या माध्यमातून त्याने मदतीचे आवाहन करताच मदतीचा ओघ सुरू झाला.

गावातील तरुण, बाहेर गावातील ग्रामस्थ व जवळच्या पाहुणे मंडळी असे 70 हून अधिकजणांनी 200, 500, 1000, 2100 अशी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम किंवा अकाउंटवर जमा केली. मदत निधी जमा झाल्यानंतर तरुणांनी पुढाकार घेऊन, स्वतः वेळ देऊन शाळेचे प्रवेशद्वार, कंपाऊंड, लोखंडी गेट, पाण्याची टाकी आदींची दुरुस्ती करून रंग रंगोटीचे काम हाती घेतले, ते कामही पूर्ण झाले असून शाळेसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. रूईछत्रपती येथील एका तरूणाने सोशल मीडियाद्वारे शाळेचा कायापालट करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला एक प्रयत्न इतर गावांसाठी दिशादर्शक असून, या तरुणाचे तालुक्‍यातून कौतूक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.