Badlapur । बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक शाळेबाहेर जमले आहेत. शाळा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांकडून निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तर आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला
दीपक केसरकर म्हणाले,’हा एक धक्कादायक प्रसंग आहे. आम्ही या प्रकरणानंतर तातडीने बैठक बोलावली आहे. सचिव , अधिकारी शिक्षण आयुक्त विभागातील अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. साधारण सात महिन्यापूर्वी मी अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली होती त्यावेळी मी सखी सावित्री समिती तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले होते. आता सुद्धा हि समिती सुरु झाली की नाही याच्या बदल माहिती घ्यावी लागेल. शेवटी मुलींनीही सुरक्षा सर्वात महत्वाची आहे.’
ते पुढे म्हणाले,’हे आदेश दिल्यानंतर सुद्धा समिती अशा समित्या स्थापन झाल्या नसेल तर त्या ब्लॉक एजुकेशन अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येईल. असे प्रसंग पुन्हा घडू नये यासाठी आज आम्ही काही चर्चा करतोय त्यामध्ये महत्वाचे म्हणजे पॉस्को ऍक्टप्रमाणे एक इ बॉक्स (तक्रार बॉक्स) प्रत्येक शाळेत असते आवश्यक आहे. त्या बॉक्समध्ये शाळेतील विद्यार्थी तक्रार करू शकतात. यातील तक्रारीची दखल शाळेतील मुख्यध्यापकांनी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात किंवा लहान मुलांना याबाबत समजत नाही. त्या ठिकाणी विशाखा समिती करण्यात यावी कारन काही लहान मूळ शिक्षकांना सांगायला घाबरतात अशावेळी ते शाळेतील त्यांच्या पेक्षा मोठया वर्गातील मुलांना तक्रार करू शकतात.’ असेही त्यांनी सांगितले
बदलापूर प्रकरणावर बोलताना ते पुढे म्हणाले,’अशी परिस्थिती कुठल्याही मुलींवर येऊ नये माझ्या कडे आलेल्या अहवालानुसार हा प्रकार १ ३ ते १ ५ ऑगस्टला घडला होता त्यानंतर तब्बल १ २ तास तक्रार घेतली गेली. त्याच्यानंतर आम्ही शाळेला नोटिस बजावली असून शाळेतील मुख्यध्यापिका, वर्ग शिक्षक, कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. गुन्हेगारावर शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कारवाई अशी मागणी आम्ही करणार आहोत.’ असेही त्यांनी सांगितले.