माऊलींच्या पालखीचे दिवे घाटातील नयनरम्य दृश्ये

सासवड –  माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. लाखो वारकऱ्यांचा मेळा आता दिवे घाटात दाखल झाला आहे. दिवे घाट चढताना वारकऱ्यांचे नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

 

आळंदी ते पंढरपुर पालखी महामार्गावरील पुरंदर तालुक्‍यातील दिवे घाट हा संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात कठीण व चढाईस अवघड असा टप्पा. या घाटातून पालखीचे प्रस्थान होत असताना दिवे घाटात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. पुणे-पंढरपूर या राष्ट्रीय पालखी महामार्गावरून पालखी सोहळाच नव्हे तर मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, केतकावळे, भुलेश्‍वर आणि किल्ले पुरंदर येथे जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्याही मोठी आहे. याच कारणातून दिवे घाटात सातत्याने वर्दळ असते, ही बाब लक्षात घेऊन घाटातील दरडींबाबत काळजी घेणे गरजेचे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.