सातारा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच; उदयनराजे भोसले यांना दिलासा

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपच्या गोठ्यात दाखल झालेले सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर करताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.

दरम्यान, आज (मंगळवार) केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्याच्या विधानसभेसोबत 21 ऑक्टोबरला सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे.

निवडणूक विधानसभेसोबत न झाल्यास शिवेंद्रराजे काम करतील कि नाही याची चिंता उदयनराजे यांना भेडसावत होती. त्यातच शरद पवार यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे साताऱ्याची लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.