सांगली : सांगली महापालिका उद्यापासून पूर्णपणे शंभर टक्के लॉक करण्यात येणार आहे. कोरोनाचा सांगली जिल्ह्यात पहिला बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. सांगली शहरातील प्रमुख रस्ते वगळता सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहारही बंद करण्यात येणार आहेत.
तसेच हॉटस्पॉट असलेल्या विजयनगर परिसरामध्ये ड्रोन कॅमेराद्वारे नागरिकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसंच कोणीही बाहेर पडूनये यासाठी या परिसरात पोलिसांचा तास पाहारा राहाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा यांनी दिली आहे.
सांगली शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून शहरातून विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणीही बाहेर फिरु नये असं आवाहन सोहेल शर्मा यांनी केलं आहे.