2022 च्या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच; इच्छुक उमेदवारांकडून मागवले अर्ज

लखनौ – उत्तर प्रदेशात सन 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, पण त्यासाठी समाजवादी पक्षाने आत्तापासूनच तयारी सुरू केली असून त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागवले आहेत.

19 ऑक्‍टोबरपासून आम्ही इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले असून 26 जानेवारीपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे त्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. ज्या मतदार संघांमध्ये पक्षाचा आमदार आहे त्या मतदार संघांमधून मात्र इच्छुकांचे अर्ज मागवले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही ब्लॉक आणि बूथ पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे असेही ते म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवण्याची सूचना पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी जनसंपर्काच्या दौऱ्यावर जाण्यास सुचवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.