पुणे – राज्यातील इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांकडे फी थकली आहे. त्यात शासनाकडून आरटीई प्रवेशाचा फी परतावाही शाळांना वेळेत मिळत नाही. यामुळे इंग्रजी शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या असून 6 लाख शिक्षकांचे 2 महिन्यांचे वेतन थकले आहे. दरम्यान, याप्रकरणी योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी इंडिपेंडंट इंग्लिश स्कुल असोसिएशनचे (ईसा) प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा, कार्याध्यक्ष राजेंद्र सिंग, सचिव भरत भांदरगे पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊनच्या दहा दिवस आधी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था 14 मार्चपासून बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शाळांची लाखो रुपये फी पालकांकडे थकली आहे. सुमारे 30 ते 50 टक्के फी ही पालकांकडे थकली आहे.
विध्यर्थ्यंचया शिक्क्षनच काय तुम्हाला त्यांचा वेतन च पडल आहे