सैनिक फेडरेशन प्रतिनिधी मंडळाने घेतली राज्यपालांची भेट

वाघोली : माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार  ब्रिगेडियर सुधीर सावंत  यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक फेडरेशन प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल  भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली.

याप्रसंगी  सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष दीपक राजे शिर्के, सैनिक फेडरेशनचे मुख्य संघटक पोपटराव दाते, सैनिक फेडरेशनचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल सातव, सैनिक फेडरेशन मुंबई चे अध्यक्ष  फ्लेचर पटेल, सैनिक फेडरेशन पुणे अध्यक्ष बाबासाहेब जाधव  आदी उपस्थित होते.

या वेळी सैनिकांचे प्रलंबित असणारे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी महामहिम राज्यपाल यांना केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.