मुंबई – चलन बाजारात भारतीय रूपयाने आज नीचांकी पातळी गाठली आणि डॉलरच्या तुलनेत रूपयाचा दर 77 रूपये 42 पैसे इतका झाला आहे.
विदेशी बाजारपेठेतील अमेरिकन चलनाची मजबुती आणि परकीय चलनाचा साठा कमी झाल्यामुळे रूपयाची किंमत पडली. आज चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 77.17 वर उघडला, 52 पैशांची घसरण नोंदवून तो 77.42 रूपयावर बंद झाला.
शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 55 पैशांनी घसरून 76.90 वर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती अस्थिर आहेत. तसेच भारताच्या शेअर बाजारातही सतत घसरण होताना दिसते आहे.
तशातच भारताकडील परकीय चलन साठ्यात वाढ होण्याऐवजी अलिकडच्या काळात त्यात सातत्याने घसरणच होताना दिसत आहे. आज डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत घटल्याने आयातीवरील खर्चही वाढणार आहे.