मुंबई – चलन बाजारात आज भारतीय रूपयाची किंमत आज पुन्हा तेरा पैशांनी घसरली. त्यामुळे चलन बाजारात आज रूपयाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत 78 रूपये 17 पैसे इतके झाले.
परकीय गुंतवणूकदारांकडून अजून भारतातील गुंतवणूक काढून घेण्याचा प्रकार सुरूच असल्याने बाजारातील वातावरण नरम झाले आहे. त्याचा परिणाम भारतीय चलनाच्या किंमतीवर होत आहे.
अमेरिकेतील व्याज दरात 50 बेसिक पॉईन्ट्सने वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच चलन बाजारात डॉलर्सची किंमत आणखी मजबूत झाली आहे त्याचाही भारतीय चलनावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारच्या व्यवहारात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 4 हजार 502 कोटी रूपयांची गुंतवणूक काढून घेतली. त्यामुळे शेअर बाजारात आजही घसरण दिसून आली.