मुंबई – सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर शरद पवारांचे नातू रोहित पवार चांगलेच संतापले आहेत. गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? समोरच्या पक्षाचं राजकारण म्हणजे डबल ढोल असल्याची टीका रोहित पवारांनी फेसबुक पोस्टमधून केली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्ष सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.