Eknath Shinde | राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते. यामुळे शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. याबद्दल टीका सुरू झाल्याने अखेर शिंदे यांचा प्राधिकरणात समावेश करण्यात आला आहे.
प्राधिकरणाच्या नियमात बदल करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार मुख्यमंत्री हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात परतण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये 9 सदस्य
प्राधिकरणाच्या कामकाज पद्धतीनुसार संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश त्यात केला जातो. नगरविकास खात्याच्या मंत्र्यांचा समावेश याआधी त्यात नव्हता. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीस गृहमंत्री या नात्याने त्यात होते. नव्या रचनेनुसार, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष व नऊ सदस्य असतील. Eknath Shinde |
त्यात मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असतील. पदसिद्ध सदस्य पदासाठी मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील. २०१९ च्या रचनेनुसार मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असत. तर महसूल, वित्त, गृह, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य या विभागांचे मंत्री हे सर्व पदसिद्ध सदस्य होते. मात्र आता शिंदेंसाठी समितीत बदल करण्यात आलेला आहे.
महायुतीत राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेची ताकद अधिक असतानाही एकनाथ शिंदेंना वगळल्याने शिवसेनेत नाराजीची चर्चा होती. टिकेनंतर सरकारने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समितीमध्ये समावेश केला आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल करत सरकारने थेट हा विषय निकाली काढला आहे.
शिंदे गटाला एकापाठोपाठ एक धक्के
दरम्यान, मुख्यमंत्री, गृहमंत्रिपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. तसेच, शिंदेसेनेच्या दोन मंत्र्यांना पालकमंत्रिपदीही मिळू शकले नाही. पालकमंत्री पदामध्ये रायगडावरून महायुतीमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर थेट शिंदे यांनाच आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्यात आले आहे. सलग शिंदे गटाला धक्के बसत असताना आता शिंदेंचे पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये कमबॅक होणार आहे.
हेही वाचा: