अखेर प्रभासच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. बाहुबली फेम अभिनेत्याने आपल्या आगामी चित्रपटाचे टायटल आणि लूक पोस्टर रिलीज केले आहे. “राधेश्याम’ असे या चित्रपटाचे नाव असून यात प्रभास आणि पूजा हेगडेची रोमॅंटिक केमिस्ट्री दिसणार आहे.
या चित्रपटाला अजूनही “प्रभास 20′ असे संबोधले जात होते. आता प्रभासच्या रोमॅंटिक ड्रामाला टायटल मिळाले आहे. “राधेश्याम’ चित्रपटाचे 5 पोस्टर्स वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज झाली आहेत. हा चित्रपट 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हिंदीचादेखील समावेश आहे. हा चित्रपट सन 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये येईल. राधेश्याम हा एक बिग बजेट चित्रपट आहे. प्रभासने इंस्टावर चित्रपटाचे पोस्टर्स शेअर केले आहेत.
पोस्टरमध्ये प्रभास सूटेड-बुटेड लुकमध्ये हॅंडसम दिसत आहे. दुसरीकडे पूजा हेगडे रेड गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसत आहेत. या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा एका रोमॅंटिक डान्ससाठी पोज देताना दिसत आहे. हे पोस्टर चाहत्यांना खूपच आवडले असून त्याला अनेक लाईकस् मिळत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार यांनी केले असून प्रथमच प्रभास-पूजाची जोडी ऑन स्क्रीनवर दिसणार आहे. याशिवाय प्रियदर्शी, भागश्री हेही मुख्य भूमिका साकारत आहेत.