मुंबई : मुंबईच्या अंधेरी पूर्व भागात रोल्टा कंपनीला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. अग्निशमन दलानी दिलेल्या माहितीनुसार ही आग रोल्टा कंपनीच्या दुसर्या मजल्यावर लागली आहे. ही आग इतर भागातही पसरली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.