मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनया छाप सोडणार महाराष्ट्राचा सुपरस्टार सुबोध भावे नेहमीच चर्चेत असतात, आपल्या मराठमोळ्या खासशैली तसेच मार्मिक चित्रपटांमुळे सुबोध भावे सिनेरसिकांच्या मनात वेगळीच जागा आहे. मराठी बायोपिक आणि अभिनेता ‘सुबोध भावे’ यांचे एक समीकरण जुळले आहे. ‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’,’प्रल्हाद केशव अत्रे’ अशा अनेक बायोपिक गाजल्या आहे. आता त्यांनी राजकारणातील ‘चाणक्य’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, सुबोध भावे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या जीवनपट रूपेरी पडद्यावर आणायचा आहे. अशी इच्छा व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलतांना सुबोध भावे म्हणाले,’शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहे. त्यांनी आज पर्यंत जेवढं बघितले आहे ते आजपर्यत कोणीच बघितले नाही.
राजकारणात सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो अशा पवारांची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल.अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.