सरकारी कार्यक्रमांना विरोधाची भूमिका योग्य नाही

मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळा कार्यक्रमाला आक्षेप घेणारा अर्ज फेटाळला
मुंबई  : सायलेन्स झोन (शांतता क्षेत्र) म्हणून घोषीत झालेल्या दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानाचा ताबा असलेल्या पालिकेने प्रशासनाने एखाद्या कार्यक्रमाला जर रितसर परवानगी दिल्यानंतर वॉचमनची भूमीका आम्ही निभावयाची काय? असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.

केवळ सरकारी कार्यक्रमांना विरोध करण्याची भुमिका योग्य नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खंडबोल सुनवित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळा कार्यक्रमाला आक्षेप घेणारा अर्ज लावला. उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषणासंदर्भातील याचिकांवर निर्णय देताना सायलेन्स झोन (शांतता क्षेत्रात) लाऊडस्पिकरला बंदी घातली आहे.

या बंदीनंतरही सायलेन्स झोन म्हणून घोषीत झालेल्या या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमांना लाऊडस्पिकरचा वापर केला जात असल्याचा आरोप करून विकॉम ट्रस्टने 2010मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, 28 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा शपथविधी सोहळा हा नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्यांनी नोटीस ऑफ मोशन दाखल केले होते. या अर्जावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.