जेरुसलेम – गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या दिशेने सोडण्यात आलेली रॉकेट इस्रायलच्या क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेने हवेतच अडवली असल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे. पॅलेल्टाईनच्या जवळच्या किनारपट्टीजवळच्या इश्कोल प्रादेशिक परिषदेच्या भूप्रदेशात या रॉकेटमुळे नागरिकांना सावध करण्यासाठी सायरन वाजू लागले होते.
ही रॉकेट हवेतच पाडण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले. इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टिमने ही रॉकेट हवेतच गाठून उद्ध्वस्त केली.
सोमवारी इस्रायलच्या तुरुंगातून पळालेल्या 6 कैद्यांपैकी दोघा कैद्यांना इस्रायलच्या पोलिसांनी पकडल्यानंतर थोड्याच वेळात हा रॉकेट हा झाला. हे दोघेही पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. गिलीबोआ याथील तुरुंगातून 6 कैदी पळाल्यानंतर संपूर्ण इस्रायल आणि वेस्ट बॅंक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. दोघाजणांना पकडण्यात आले असले तरी अजून चार कैदी फरार आहेत.