ज्येष्ठ महिलेचे हातपाय बांधून दिवसाढवळ्या लुटमार

तळेगाव दाभाडे – येथे दिवसाढवळ्या घरात शिरुन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेचे हातपाय बांधून लोखंडी गजाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील साडे पंधरा तोळे सोन्याचे दागिन्यांसह एक लाख 66 हजार रुपये रोकड असे एकूण चार लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. 29) सकाळी अकरा वाजता घडली. या प्रकरणी सुरया अब्दुल तांबोळी (वय 65, रा. सोमवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तळेगाव दाभाडे शहरात खळबळ उडाली. दिवसाढवळ्या दरोड्याची घटना घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरया तांबोळी या पूजेचे साहित्य विकून उदरनिर्वाह करतात. लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान असल्याने सकाळी लवकर मतदान करण्यासाठी निघाल्या असता त्यांच्या घरात अनोळखी दोन चोरटे शिरले. त्यांना वाटले मतदानासाठी नेण्यासाठी आला आहे का ? असे विचारले असता त्यांनी तांबोळी यांचे दोरीने हातपाय बांधले. लोखंडी गजाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. हाताने मारहाण करुन त्यांच्याकडे दागिने कोठे आहेत, याची विचारणा केली.

बेडरुममधील लोखंडी पेटीची चावी जबरदस्तीने घेतली. लोखंडी पेटीतील सात तोळे वजनाचा राजमाता हार, अर्धा तोळा कर्णवेल, सहा तोळे वजनाच्या दोन बांगड्या, आयरीन, तीन तोळ्याचे मंगळसूत्र आणि एक लाख 66 हजार रुपये असा 4 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला. चोरट्यांनी तांबोळी यांचे हातपाय व तोंड बांधून पोबारा केला. या घटनेने तळेगाव दाभाडे शहरात खळबळ उडाली अडून दिवसाढवळ्या दरोड्याची घटना घडल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काळूराम गवारी तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.