पुस्तकाच्या गावातील रस्ते होणार चकाचक

कॉंक्रिट रस्त्याच्या कामाला सुरुवात 

पाचगणी – पुस्तकाचं गाव अशी नव्याने ओळख निर्माण झालेल्या भिलारमधील रस्ता आता चकाचक होणार आहे. येथील मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा नुकताच नारळ फोडण्यात आला.

भिलार (पुस्तकाचे गाव) येथे महाराष्ट्र शासन सर्वजिनिक बांधकामच्या अंतर्गत 5 कोटी 34 लाखाचे अडीच किलोमीटर 5.5 मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. भिलार हे जगातील दोन नंबरचे ना. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून पुस्तकाचे गाव उदयास आले. या गावाला अनेक साहित्यक, लेखक, पर्यटक भेट देत असतात. पण या गावातील मुख्य रस्त्याची अडचण ओळखून या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. या रस्त्यात होणारी वाहतुकीची अडचण ओळखून विनोद तावडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव व त्याचे इस्टीमेट मागवण्यात आले व तसा प्रस्ताव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने पाठपुरावा करण्यात आला व त्याचे इस्टीमेट तयार करण्यात आले. मंगळवारी या कामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे, बांधकाम विभागाचे उपअभियंते महेश गोंजारी, राजेंद्र, ठेकेदार अरुण देसाई, श्री. जाधव, सरपंच वंदना भिलारे, प्रविण भिलारे, संजय भिलारे, अनिल भिलारे, आनंदा भिलारे (माजी सरपंच), पांडुरंग मोरे, प्रशांत भिलारे, गणपत पार्टे, सागर भिलारे, प्रकाश गावडे, बाजीराव भिलारे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. रस्त्याची मापे घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बाळासाहेब भिलारे, प्रवीण भिलारे, अनिल भिलारे, संजय भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, काम सुरु असताना रस्त्याच्या कामात निर्माण होणारे अडथळे, अतिक्रमणे ग्रामस्थांनी स्वत:हून काढून सहकार्य करावे, म्हणजे हे काम
डिसेंबरअखेर पूर्ण करता येईल.

महेश गोंजारी उपअभियंता, बांधकाम विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)