मोठी बातमी… उद्या रात्रीपर्यंत पुण्यातील ‘हा’ रस्ता बंद राहणार; वाचा ‘पर्यायी मार्ग’

पुणे  – नववर्षाच्या निमित्ताने नागरिक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. यांसह मध्यरात्री 1 वाजेपर्यंत रहदारीच्या सुमारे 30 चौकांतील सिग्नल सुरू राहणार आहेत.

 

 

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले. अग्निशमन वाहने, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक वाहने वगळता शिवाजी रस्त्यावर सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक वळवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत शिवाजी रस्त्यावरील चारचाकी वाहने आणि सर्व प्रकारच्या बसेस वाहतुकीसाठी बंदी केली आहे.

 

 

स्वारगेटकडे जाताना

स.गो. बर्वे चौकातून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक स.गो. बर्वे चौक-जंगली महाराज रस्त्यामार्गे-खंडोजी बाबा चौक-टिळक चौकमार्गे टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

 

 

मनपा भवनाकडे जाताना

स.गो. बर्वे चौकातून पुणे महापालिका भवनाकडे जाणारी वाहतूक स.गो.बर्वे चौक-जंगली महाराज रस्त्यामार्गे झाशीची राणी चौकाकडून डावीकडे वळून मनपा भवनकडे वाहनचालकांना जाता येणार आहे.

 

 

सुमारे 30 चौकांतील सिग्नल रात्री 1 वाजेपर्यंत राहणार सुरू

वाहनांची गर्दी लक्षात घेता, वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने शहरातील वेगवेगळ्या भागातील प्रमुख चौकांतील सिग्नल यंत्रणा मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मध्यरात्री 1 वाजेपर्यंत 30 चौकांतील सिग्नल सुरू राहणार आहेत. यामध्ये पुणे विद्यापीठ चौक, नळस्टॉप चौक, टिळक चौक, मार्केटयार्ड चौक, सिंहगड रोड चौक, एबीसी फार्म, गोल्फ क्लब चौक, बोपोडी चौक, खंडोजी बाबा चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, सिमला ऑफिस चौक, शाहीर अमर शेख चौक, जेधे चौक, राजाराम पूल चौक, फातिमानगर चौक, शास्त्री नगर चौक, सादलबाबा चौक, गुडलक चौक, झाशीची राणी चौक, सेव्हन लव्ह्ज चौक, लुल्ला नगर चौक, केशवनगर मुंढवा, कोरगाव पार्क जंक्शन, खराडी चौक आदी चौकांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.