Statue of Unity | मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल बुधवारी मालवणमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यावेळी ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यादरम्यान आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱ्या रस्त्याबाबत एक माहिती समोर आली आहे.
बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता पुराच्या पाण्यात तुटला आहे. यामुळे एका बाजुने वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. मुसळधार पावसाने सोडलेल्या धरणाच्या पाण्यामुळे हा रस्ता तुटून गेला. काँग्रेसने या रस्त्याचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला यायचे असेल तर तुमचं या तुटलेल्या रस्त्यावर स्वागत आहे अशी खोचक पोस्ट काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसची पोस्ट
‘वेलकम टू स्टॅच्यू ऑफ युनिटी! या ठिकाणचा रस्ता म्हणजे एक भलमोठं कोडं बनले आहे. जर तुम्ही सुखरुप स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहचू शकला, तर तुम्हाला काही एक्स्ट्रा पॉईंट मिळतील,’ अशी खोचक पोस्ट काँग्रेसने केली आहे. रस्त्याची ही अवस्था पाहिल्यानंतर याचे काम पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागण्याची शक्यता आहे.
Welcome to the Statue of Unity! Where the road doubles as a giant jigsaw puzzle. Extra points if you reach the statue in one piece! pic.twitter.com/Ln0rT6fQN1
— Congress Kerala (@INCKerala) August 28, 2024
जगातील सर्वात मोठा पुतळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना भारताचे लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा 2013 मध्ये भूमिपूजन केलं होतं. 2018 मध्ये हा जगातील सर्वात मोठा पुतळा उभा राहिला होता. यासाठी 2989 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येत आहेत. मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्त्याच तुटल्याने भाजपवर आणि मोदींवर टीका केली जात आहे.
हेही वाचा: