आठ महिन्यांपूर्वीचा रस्ता उखडला

निमसाखरच्या खंडोबानगरमध्ये नागरिक आक्रमक

निमसाखर (वार्ताहर)- निमसाखर (ता. इंदापूर) येथून जवळ असलेल्या खंडोबानगरमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आठ महिन्यांपूर्वी सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम झाले होते. सध्या सिमेंट रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून ग्रामस्थांना ये-जा करताना त्रास होत आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन खंडोबानगर परिसरातील नागरिकांनी दिले आहे निमसाखर-वालचंदनगर रोडवर निमसाखरपासून खंडोबानगर ही वस्ती केवळ दीड किलोमीटरवर रस्त्यालगत आहे. या ठिकाणी 500 ते 600 लोकसंख्या आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दलित वस्तीमध्ये सिमेंटचा रस्ता करावी, अशी मागणी नागरिकांची होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेमधून रस्ता मंजूर झाला आहे. त्यासाठी 17 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार 2018-19 मध्ये हा सिमेंटचा रस्ता संबंधित ठेकेदाराने आठ महिन्यांपूर्वी काम पूर्ण केले आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांतच हा रस्ता उखडला आहे. रस्त्याच्या साईडपट्टयांवर संबंधित ठेकेदाराने मुरूमीकरण करणे गरजेचे होते. मात्र, अनेक ठिकाणी दर्जा नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. निकृष्ट रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून रस्ता दुरुस्त करा, अशी मागणी ग्रामपंचायकडे केली आहे. इंदापूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन पाठवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रस्त्याबाबत लेखी निवेदन मिळाले आहे. मासिक बैठकीमध्ये चौकशीसाठी ठराव व पत्र जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता यांना पाठवणार आहे. त्यानुसार चौकशी होऊन त्या अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार गरज पडल्यास ठेकेदारांकडून दुरुस्त केला जाईल. किंवा संबंधीत ठेकेदाराची चूक अढळल्यास कारवाई होऊ शकते.
सुधाकर भिलारे, ग्रामविकास अधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.