… अन्‌ तब्बल 23 वर्षांनंतर खुला झाला ‘हा’ रस्ता आणि पूल

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले उद्घाटन

कोथरूड (पुणे)  – नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी विकासकामे वेळेत पूर्ण करणे ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. मात्र, अनेक वर्षापासून रखडलेली विकासकाम नगरसेवक किरण दगडेपाटील यांनी वारंवार बैठका घेऊन ते काम मार्गी लावले. त्यावरून त्याची कामाविषयी असलेली तळमळ दिसून येते. हीच तळमळ प्रत्येक लोकप्रतिनिधीमध्ये असावी, असा भावना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

 

 

 

23 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मौर्य विहार सोसायटीतील नागरिकांच्या सोयीचा रस्ता आणि हक्काचा पूल खुला झाला. त्यावेळी नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

 

 

या रस्त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक किरण दगडेपाटील व दिलीप वेडेपाटील, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, पुनीत जोशी, स्वीकृत सभासद वैभव मुरकुटे, विलास मोहोळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

किरण दगडे म्हणाले, राजकीय जीवनात अनेक नागरिकांच्या समस्या सोडवल्या. मौर्य विहार सोसायटीसह येथील पुलाचे काम 23 वर्षांपासून प्रलंबित होते. या दरम्यानच्या निवडणुका रस्त्याच्या विषयावर लढवल्या गेल्या. मात्र, रस्ता झाला नाही. मी निवडून आल्यावर अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.