Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

अर्थकारण : देशातील युनिकॉर्न्सची भरारी

- हेमंत देसाई

by प्रभात वृत्तसेवा
May 5, 2022 | 5:45 am
A A
अर्थकारण : देशातील युनिकॉर्न्सची भरारी

उद्योजकतेमधील घराणेशाही संपून, कुठलीही आर्थिक पार्श्‍वभूमी नसलेल्या तरुणांना व्यवसाय-उद्योग सुरू करण्यासाठी सध्याचे वातावरण अनुकूल असून, ही अतिशय दिलासादायक बाब आहे.

बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रारंभिक समभाग विक्रीला सुकाणू गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे, भांडवली बाजारात आनंदाचे वातावरण आहे. देशाच्या भांडवली बाजारातील ही आजवरची सर्वात मोठी सार्वजनिक भागविक्री आहे. दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे, चालू वर्षात केवळ एप्रिलमध्येच 17 लाख एअरकंडिशनर्सची विक्री झाली आहे. एप्रिल 2021च्या तुलनेत ही विक्री दुप्पट आहे आणि एप्रिल 2019 मधील आकडेवारीपेक्षा ती 30 ते 35 टक्‍के जास्त आहे. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या, म्हणजे एप्रिल महिन्यात भारताच्या निर्यातीत 24 टक्‍के वाढ झाली आहे. ही निर्यात 38 अब्ज डॉलर्स झाली आहे. जगातील विकसित राष्ट्रांमधील ऊर्जा संकट आणि वाढलेल्या किमतींमुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीस मदत झाली आहे. याच उत्पादनांची निर्यात सात अब्ज डॉलर्स इतकी झाली. तर अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात नऊ अब्ज डॉलर्स इतकी झाली. थोडक्‍यात, सर्वच काही नकारात्मक आहे, असे मानण्याचे कारण नाही.

भारतातील व्यापार व उद्योगाचे वातावरण करोनाच्या खाईतून बाहेर येत आहे. झेप्टो या इन्स्टंट ग्रोसरी स्टार्टअपने वीस कोटी डॉलर्स इतक्‍या भांडवलाची उभारणी केली आहे. वाय कॉम्बिनेटरच्या नेतृत्वाखाली ही भांडवल उभारणी झाली आणि स्थापनेनंतरच्या नऊ महिन्यांतच कंपनीचे मूल्यांकन 90 कोटी डॉलर्स इतके झाले. करोनामुळे सर्वजण घरी बसून असताना ऑनलाइन व्यवसाय भरभराटीला आला होता. त्यामुळे लोकांना घरच्या घरी वाणसामान, भाज्या, फळे, कपडेलत्ते, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू वगैरेंची खरेदी करण्याची सवय लागली. आता तर ऑर्डर दिल्यानंतर जेवढ्या वेगाने माल घरपोच येईल, तेवढा त्या कंपनीचा धंदा बरकतीस येतो.

झेप्टोचा माल तर ऑर्डर दिल्या दिल्या दहा मिनिटांत घरी येतो. झेप्टो हा स्टार्टअप सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांतच कैसर परमनेंटे या नवीन गुंतवणूकदाराने आपला निधी कंपनीत ओतला. शिवाय नेक्‍सस व्हेंचर पार्टनर्स, ग्लेड ब्रुक कॅपिटल आणि लॅची ग्रूम या सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांनी झेप्टोमधील आपली गुंतवणूक वाढवली. परिणामी झेप्टोमधील विविध कंपन्यांचा एकूण निधी 36 कोटी डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एखाद्या नव्या कंपनीत जेव्हा इतके भांडवल येते, तेव्हा त्या कंपनीवरचा विश्‍वासही प्रकट होतो आणि त्या कंपनीच्या भविष्याबद्दलची खात्रीदेखील. आदित पलिशा आणि कैवल्य व्होरा या दोन बालमित्रांनी झेप्टो सुरू केली आहे. दोघेही स्टॅन्फोर्ड विद्यापीठात संगणक विज्ञान शिकत होते; परंतु दोघेही अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परतले आणि त्यांनी झेप्टोची स्थापना केली. उभयतांचे वय अवघे 19 वर्षांचे आहे. परंतु या दोघांचे डोके अफलातून आणि दहा मिनिटांत सेवा देण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची कार्यक्षमतादेखील वाखाणण्यासारखी. झेप्टोमुळे गुगलचे पाठबळ असलेली डन्झो, सॉफ्टबॅंक समूहाचे समर्थन असलेली ब्लिंकइट आणि नॅस्पर्स लिमिटेडचे छत्र असलेली स्विगी या कंपन्याही हादरल्या असणार.

भारताची रिटेल बाजारपेठ एक ट्रिलियन डॉलर्सची आहे. त्यामध्ये ऍमेझॉन आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट या कंपन्या आघाडीवर आहेत. गेल्या तिमाहीत झेप्टोची उलाढाल 800 टक्‍क्‍यांनी वाढली. झेप्टोत आता एक हजार माणसे काम करतात. आता लवकरच मुंबईच्या काही ठराविक भागांमध्ये ही कंपनी कॉफी, चहा यासारख्या गोष्टीही उपलब्ध करून देणार आहे. झेप्टोसारख्या कंपनीच्या यशामुळे भारतातील विविध विद्यापीठांत व्यवस्थापकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, आपणही नवा स्टार्टअप सुरू करावा, असे वाटू लागले आहे.

एकीकडे केंद्र सरकारकडून इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेसाठी नुकतेच 820 कोटी रुपयांचे अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे. पोस्टाच्या पेमेंट्‌स बॅंकेला आर्थिक सर्वसमावेशकतेच्या उपक्रमासाठी आणि बॅंकिंग व्यवस्था जेथे पोहोचलेली नाही अशा देशातील ग्रामीण व दुर्गम ठिकाणी सेवा पुरवण्यासाठी, या निधीचा उपयोग होणार आहे. पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेतील 77 टक्‍के खाती ग्रामीण भागात उघडली गेली आहेत. एकूण सव्वापाच कोटी खात्यांपैकी जवळपास निम्मी खाती महिलांची असून, त्यात एक हजार कोटी रुपये जमा आहेत. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी या बॅंकेत 7.8 लाख खाती उघडण्यात आली आहेत. पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेमुळे ग्रामीण अर्थव्यवहार वाढणार आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे तेथील उद्योजकतेस हळूहळू चालना मिळणार आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर, बंगळुरूमधील “ओपन’ या निओ बॅंकिंग फिनटेक पोर्टलने पाच कोटी डॉलर्सची भांडवल उभारणी केली आहे. त्यात सिंगापूरच्या टेमसेक, अमेरिकेतील टायगर ग्लोबल आणि थ्रीवनफोर कॅपिटल या भारतीय कंपनीने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहे. यापूर्वी या स्टार्टअपमध्ये गूगल, व्हिसा, जपानची सॉफ्टबॅंक यांनी गुंतवणूक केली होती. ओपन ही भारतातली शंभरावी युनिकॉर्न कंपनी ठरली आहे.

2020-21च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे की, सर्वात जास्त युनिकॉर्न असलेल्या देशांचा विचार करता, अमेरिका आणि चीननंतर आता भारताचा क्रमांक लागतो. यापूर्वी ब्रिटन तिसऱ्या स्थानावर होते, परंतु आता भारताने त्यास मागे टाकले आहे. एक अब्ज डॉलर्स इतके मूल्यांकन असलेली कंपनी युनिकॉर्नमध्ये मोडते. अशी कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध नसते. मात्र या अशा स्टार्टअप कंपन्यांमध्ये उज्ज्वल भविष्याची चाहूल दिसल्यामुळे, देशविदेशांतील अव्वल व नामांकित फंड त्यामध्ये गुंतवणूक करत असतात. भारतात रतन टाटा यांच्यासारखे ख्यातकीर्त उद्योगपतीदेखील तरुण-तरुणींच्या कल्पक उपक्रमांना आर्थिक पाठबळ उभे करत असतात.

Tags: countryeditorial page articlerise of unicorns

शिफारस केलेल्या बातम्या

देशातील ‘या’ गावात भारतीय कायदा चालत नाही; इथे आहे स्वतःची संसद आणि संविधान…
राष्ट्रीय

देशातील ‘या’ गावात भारतीय कायदा चालत नाही; इथे आहे स्वतःची संसद आणि संविधान…

1 day ago
अग्रलेख : संघर्ष निर्णायक टप्प्यात
Top News

अग्रलेख : संघर्ष निर्णायक टप्प्यात

3 days ago
राजकारण : केरळ भाजपमधील दुही
Top News

राजकारण : केरळ भाजपमधील दुही

3 days ago
वेध : कॉलेजियमचा वाद थांबणार कधी?
Top News

वेध : कॉलेजियमचा वाद थांबणार कधी?

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: countryeditorial page articlerise of unicorns

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!