दिल्लीतील दंगल स्वातंत्र्यानंतरची सर्वात भीषण

नवी दिल्ली – या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेली दंगल ही स्वातंत्र्यानंतर दिल्लीत झालेली सर्वात वाईट जातीय दंगल होती, असे निरीक्षण दिल्लीतील न्यायालयाने नोंदवले आहे. या दंगलीशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये आम आदमी पार्टीचे माजी समन्वयक तहिर हुसैन यांचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने आपले मत नोंदवले.

24 फेब्रुवारी 2020 रोजी ईशान्य दिल्लीमध्ये उसळलेली दंगल एखाद्या वणव्यासारखी पसरली आणि त्या जाळपोळीनंतरचा धूर सर्व राजधानीच्या आसमंतात पसरला होता. जागतिक सत्ता बनू पाहणाऱ्या देशाच्या राजधानीतील ही जातीय दंगल म्हणजे देशाच्या विवेकावरील जखम असल्याचे निराशाजनक उद्‌गार न्यायालयाने व्यक्‍त केले.

एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात दंगल पसरवणे पूर्वनियोजित कटाशिवाय शक्‍य नाही. याचिकाकर्ते ताहिर हुसैन जरी थेट हिंसाचारात सहभागी नसले तरी ते सहभागाच्या जबाबदारीतून दूर राहू शकत नाहीत.

विशेषतः ताहिर हुसैन यांच्या घरातच दंगलखोरांचा अड्डा जमत असताना तर ते जबाबदारी निश्‍चितच नाकारू शकत नाहीत, असे दिल्लीचे अअतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.